गुहागर -गुहागरच्या तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांची मुंबई येथे बदली झाली असून लवकरच त्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, (MMRD) मुंबई येथील तहसिलदार संवर्गाच्या रिक्त पदावर हजर होणार आहेत.
गुहागरच्या तहसीलदार पदी प्रतिभा वराळे यांची वर्णी लागताच त्यांनी गुहागर मध्ये अनेक सर्वसमावेशक काम करून जनतेच्या मनात आपले एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं गुहागर तालुक्यातील कातकरी समाजासह इतर सर्वच घटकांना त्या नेहमीच त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात. त्या तहसीलदार पदी असताना त्यांनी गुहागर तालुक्यातील गिमवी कातकरवाडी येथे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत एक कार्यक्रम करून सर्वांच लक्ष वेधून घेतले होते. अत्यंत मनमिळावू आणि सगळ्याच कामांना हसतमुखपणे समोर जाणाऱ्या प्रतिभा वराळे यांची मुंबई येथे बदली झाली असून येणाऱ्या काही दिवसातच त्या आपल्या नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होतील.