गुहागर – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून १ महिन्यात दुप्पट परतावा देतो, असे आमिष दाखवून २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गुहागरात घडला आहे.या प्रकरणी खेड मधील प्रौढाच्या विरोधात गुहागर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश भागोजी सणस असे त्याचे नाव आहे.
गुहागर -चिपळूण मार्गावरील या कामामुळे आम्हाला खूपच आनंद झाला….. आम्ही असेच वागणार..
या फसवणुकीबाबत प्रतीश शंभू राजपुरे (रा. गुहागर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार हा प्रकार गुहागर येथील वरचापाट दुर्गादेवीवाडी येथे ८ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. नरेश भागोजी सणस यांनी प्रतीश शंभू राजपुरे यांच्याशी फोनद्वारे
संपर्कात राहून विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवून १ महिन्यात दुप्पट परतावा देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून २१ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले होते. मात्र, नरेश सणस याने दिलेली मुदत संपूनही अद्यापपर्यंत ठरल्याप्रमाणे रकमेचा परतावा अथवा रक्कम दिलेली नाही.या प्रकरणी गुहागर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.