खेड ; ३ हजाराची लाच स्विकारताना तहसिलदार कार्यालयातील महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

0
350
बातम्या शेअर करा

खेड- तक्रारदार व त्यांचे सहकारी यांच्या विरुद्ध खेड तहसीलदार कार्यालयात सुरू असलेली चाप्टर केस मिटवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ३ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यक चंपलाल महाजन डेढवाल याला आज रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याकडून ही रक्कम हस्तगत केली आहे.

आरोपी चंपलाल डेढवाल याने २८ डिसेंबर रोजी ३००० रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती देताच या विभागाने सापळा रचला. गुरूवारी ३००० रूपये पंचासमक्ष स्वीकारताना आरोपी डेढवाल याला रंगेहाथ पकडून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, नाईक दिपक आंबेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक शहानवाज मुल्ला करीत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here