मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे (माई ) आज होणार संघटन सचिवांची घोषणा !

0
103
बातम्या शेअर करा

मुंबई – पत्रकार, पत्रकारेत्तर कर्मचारी सर्व माध्यमक्षेत्राच्या सर्व विभागातील श्रमिकाना तसेच मालक, प्रकाशक वितरक यांना एकाच छताखाली आणून, त्यांच्या सन्मान व हित व सन्मानार्थ काम करणारी राष्ट्रीय संघटना “मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया” चे १ले अधिवेशन कलागुणाची खाण असणाऱ्या करवीर नगरीत अर्थात कोल्हापुरात देवदिवाळी दरम्यान ला करण्याचा मानस सरचिटणीस डॉ सुभाष सामंत यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करू शकतो हा विश्वास मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्यकक्षेच्या व्यापकतेतून दिसून येतो आहे! आणि म्हणूनच दि ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या संस्थापक व निमंत्रिताच्या बैठकीत सर्वप्रथम महसूल विभाग संघटन सचिव त्या जोडीला सहसंघटन सचिव नंतर जिल्हावार संघटन सचिव, महसूल विभाग प्रवक्ते यांची घोषणा होणार आहे! अशी माहिती प्रसिद्धी समन्वयक शेखर धोंगडे मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महिला मध्यमकर्मींना जबाबदारी गुणवत्तेनुसार समप्रमाणात द्यावी,
जेणेकरून करुन महिलांच्या प्रश्नाना न्याय देता येईल असेही ठरले. जिल्ह्यांची कार्यकारणी निवडल्यानंतर, राज्याची महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल आणि देशपातळीवरील पदाधिकारी व राष्ट्रीय कार्यकारिणी हे अधिवेशनात घोषित केले जाणार आहेत ! काम करणारे, वेळ देणारे पदाधिकारी असतील याची काळजी घेतली जाईल. जेष्ठ पत्रकार डॉ. कादिर सरांनी सूचना मांडल्याप्रमाणे एनजेमहाराष्ट्र चे माजी संघटन सचिव कैलास उदमले हे कायमचे निमंत्रित सदस्य असतील त्यांनी संघटन सचिव व अध्यक्ष यांच्याशी सहकार्य समन्वय करण्याचे काम करावे. तसेच जबाबदारी देताना ते कोणत्याही पक्षाचे सदस्य कार्यकर्ते नसावेत, आंधळे समर्थक नसावेत, याची प्रकर्षाने काळजी घ्यावी कारण सध्या राजकीय समर्थकांच्या संघटना वाढल्या आहेत. त्यामुळेच माध्यमकर्मीचे हित दुर्लक्षित होते आहे. तसेच साप्ताहिके व लघु, मध्यम दैनिके, वृत्तवाहिन्या, वेबपोर्टल, पत्रकारांच्या युट्युब वाहिन्या यांचे हितासाठी काम करणारे संघटनेला जोडण्याचे काम अधिक गतिमान होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला! सच्चा पत्रकारांच्या, प्रसारमाध्यमाच्या हितासाठी पारदर्शकपणे काम करणारी आपली संघटना आहे, जिल्ह्यातून ज्या संघटना आपल्यासोबत येतील त्यांना असोसिएशन म्हणून आपल्याशी जोडून घेण्याचे काम आपण संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या नेतृत्वात करू असेही सर्वानुमते ठरले!


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here