गुहागर – गुहागर तालुक्यातून विरार ,नालासोपारा, बोरिवली ,आधी ठिकाणी जवळपास दररोज 15 पेक्षा जास्त खाजगी आराम बस जात आहेत. मात्र आता याच खाजगी आराम बसच्या व्यवसायावरून चिपळूण आणि गुहागर पोलीस स्टेशनला यातीलच काही खाजगी आराम बसच्या चालक आणि मालकाने तक्रार केली आहे. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीमध्ये गुहागर तालुक्यात ट्रॅव्हल्स वार होऊन प्रवाशांच्या खोळंबा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हा तालुका समुद्राच्या कडेला असलेला एक महत्त्वपूर्ण तालुका या तालुक्याच्या अनेक भागातून मुंबई ,विरार ,नालासोपारा ,आधी भागात खाजगी आराम बस गेल्या अनेक वर्षापासून चालत आहेत. मात्र एसटी महामंडळाने महिलांसाठी सुरू विशेष 50 टक्के सूट तिकीट कपातीमुळे या खाजगी आराम बस कडे महिलांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. याचाच फटका या व्यवसायिकांना बसतोय त्यातच आता कुठलीही खाजगी आराम बस हाउसफुल चालत नसल्याने एकमेकांचे प्रवासी खेचणे ,एकमेकांचे प्रवासी पळवणे अशा अनेक घटना याआधी घडत होत्या आणि आताही घडत आहेत. याच वादाचा परिणाम होऊन सध्या काही खाजगी आराम बस चालक आणि मालकाने याच तालुक्यातील काही खाजगी आराम बस चालक मालकांना तुम्ही आमच्या तालुक्यातून गाड्या बंद करा …..तुम्ही इथले स्थानिक नाहीत ….व्यवसाय करायचा असेल तर स्वतःच्या नावाने गाड्या घ्या ….अशी दमदाटी करून एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. जर तुम्ही तुमचा व्यवसाय चालू ठेवला तर आम्ही तुमच्या गाड्या फोडू आम्ही तुम्हाला प्रवाशांन सकट रस्त्यामध्ये अडकवू आणि यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार तुम्ही असाल अशा प्रकारच्या धमक्या काही खाजगी आराम बसच्या मालकाने त्यांच्याबरोबरच व्यवसाय करणाऱ्या काही खाजगी आराम बसच्या मालकांना दिल्याची तक्रार पोलिसात दाखल आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर चिपळूण पोलीस आणि गुहागर पोलीस कोणती भूमिका घेतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
गुहागर तालुक्यातून मुंबई आणि ठाणे कडे जाणाऱ्या या खाजगी आराम बस या नक्की नियमाने चालतात का…?.. या खाजगी आराम बसना आरटीओची परवानगी आहे का..?. या बसेस नियमानुसार प्रवाशांकडून पैसे घेतात का..? यांच्या खाजगी आराम बस वरील चालक यांची वैद्यकीय तपासणी किंवा अल्कोहोल तपासणी केली जाते का..? या खाजगी आराम बस ना प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना कोणी दिला असे अनेक प्रश्न त्या निमित्ताने उभे राहिले आहेत.