गुहागर – गुहागर तालुक्यातील बो-या गावात एका ठिकाणी एक महिला गावठी हातभट्टीची व विदेशी बनावटीची दारु विक्रीचा अवैध व्यवसाय करीत असल्याचे विश्वसनीय बातमी चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांना समजली असता या ठिकाणी डीवायएसपीच्या पथकाने या महिलेच्या घरी छापा टाकला
यावेळी सुप्रिया संदेश ठाकुर नितेश दिनेश आरेकर यांना गावठी दारू व विदेशी मद्यसह ताब्यात घेतले.
त्यावेळी एलपी प्रिमीयमची ४७ बिअर बाँटल (६५० मिली) किंगफिशरची ४९ बिअर बाँटल (६५० मिली) फाँस्टरची २ बिअर बाँटल (६५० मिली) इंपेरीयल ब्लू व्हिस्की १४७ बाँटल (१८० मिली) गोल्डन एस व्हिस्की १४ बाँटल (१८० मिली) डिएसपी ब्लँक व्हिस्की ५४ बाँटल (१८० मिली) मँकडावेल नं. १ रम १० बाँटल (१८० मिली) मँकडावेल नं. १ व्हिस्की ४८ बाँटल (१८० मिली) मँकडावेल नं. १ व्हिस्की १२ बाँटल (७५० मिली) आँफिसर चाँईस व्हिस्की १६ बाँटल (१८० मिली) डायरेक्टर्स स्पेशल व्हिस्की २७ बाँटल (१८० मिली)
३५ लीटर गावठी हातभट्टीची दारु असलेले ३ कँन एलपी प्रिमीयम ची बिअरची ४८ बाँटल (६५० मिली) तसेच ५,००,०००/- रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार
असा एकुण ५,८१,९९२/- किमतीचा माल जप्त केला. यावेळी 2 आरोपी यांचेविरूध्द गुहागर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४१/२०२० महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अँक्ट कलम ६५(ई), ८३,९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.