अहमदपूर – अहमदपूर शहरात दिवसाढवळ्या पिग्मी एजंट वर कोयत्याने हल्ला करून रोख रक्कम एक लाख रुपये पळवून नेणाऱ्या तीन आरोपींना 48 तासाच्या आत पकडण्यात अहमदपूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या दमदार कामगिरीने अहमदपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अहमदपूर येथील पिग्मी एजंट अच्यूत शेळके ह पिग्मी एजेंट अहमदपूर शहरातील संत ज्ञानेश्वर नगर, टेंभूर्णी रोड, अहमदपूर हे पिग्मीचे पैसे गोळा करून टेभुर्णी रोड ने घराकडे मोटारसायकलवर जात असताना रोकडे पोलीस यांचे घरासमोर त्याचे पाठीमागून तीन अनोळखी इसम मोटारसायकलवर येवून अच्युत शेळके यांचे मोटार सायकलचे समोर आडवी लावून त्यांचे जवळ असलेली बॅग चोरून घेऊन जात असताना त्याला त्यांनी प्रतिकार केला यावेळी आरोपीने त्यांचे जवळील कोयत्याने अच्यूत शेळके यांचे वार करून त्यांना गंभीर जखमी केले त्यांचे जवळील बॅगमधील 1,00,000/- चोरी करून घेवून गेले. पिग्मी एजंट शेळके यांनी आरडो ओरड केली असता सदर आरोपी हे मोटार सायकलवर बसून पळून गेले. पिग्मी एजंट अच्यूत शेळके यांचेवर सध्या लातूर येथे उपचार चालू असून त्यांची तब्येत नाजूक असल्याचे समजते.
अहमदपूर शहरात दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने सगळीकडे एकच खळबळ माजली होती.पोलिसांनी तात्काळ आपल्या माहितीच्या आधारे
सदर गुन्हयातील संशयीत आरोपी शुभम प्रकाश जाधव रा काळेगाव ता.अहमदपूर हा जेजुरी, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने तेथे अहमदपूर पोलीस स्टेशनचे एक पथकाने त्यास जेजुरी येथे जावून
ताब्यात घेतले. तर सदर गुन्हयातील दूसरा संशयीत आरोपी वसंत शिवाजी वाडीकर रा.आदर्श कॉलनी, अहमदपूर येथील राहणारा त्यास पकडण्यासाठी पोलीसांनी सापळा रचला असता त्यास पोलीसांची चाहूल लागताच तो तेथून पळून जात असताना त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्याला पकडले त्यानंतर पोलिसांनी या तीनही आरोपीकडून कशाप्रकारे हल्ला केला याची माहिती घेतली. या हल्ल्यामध्ये वसंत शिवाजी वाडीकर ,शुभम प्रकाश जाधव , झहीर शेख अहमदपूर यांनी संगणमत करून पिग्मी एजेंट अच्यूत शेळके यांचेवर पाळत ठेवून पाठलाग करून पिग्मी एजेंट अच्यूत शेळके यांचेवर मिरची पुडी फेकून कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले व त्यांचेकडील जमा केलेले पैशाची बॅग • हिसकावून चोरून नेली आहे. अशी कबुली दिली. सदर गुन्हयातील तीन आरोपींना अटक करण्यात अहमदपूर पोलिसांना यश आले आहे.तर गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व ती हत्यार जप्त करण्यात आले आहे. तसेच नमूद आरोपीतांचे ताब्यातून चोरी केलेली रोख 25000/- रूपये मिळाली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर, अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे, लातूर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मणिष कल्याणकर, अहमदपूर यांनी पो.स्टे अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक एस. आर. देडे ,पोउपनि व्ही पी सुर्यवंशी, पोना / 1443 आरदवाड, पोकॉ/1144 डबेटवार, पोकों/ 1544 धुळगंडे, पोकों/ 1460 कज्जेवाड, पोकों / 553 पुठेवाड, पोकों/ 1746 मामडगे, पोकों/ 1857 सारोळे, चापोकों/ 423 आरदवाड, चापोकों/ 1793 शेख, चापोकों/ 1828 बेवडे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी हे करीत आहेत.