गुहागर – गुहागर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ शृंगारतळी या बाजारपेठेत दरवर्षी गणपतीला वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीमुळे बराच वेळ ट्रॅफिक जाम होते अनेक वेळा भांडणे होतात मात्र यावर्षी गुहागर पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टळली असून व्यापारी आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

गणपती हा सण कोकणात महत्त्वाचा असा उत्सव या सणासाठी लाखो चाकरमानी मिळेल त्या वाहनाने आणि एसटी बस ने खाजगी आराम बसने कोकणात येतात ज्यावेळेला ते कोकणात येतात त्यावेळेला तेथील जवळपासच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तशीच गर्दी दरवर्षी शृंगारतळी बाजारपेठेत सुद्धा होते.बाजारपेठेतील अरुंद रस्ता त्यावर लावली जाणारी वडापाची वाहने एसटी बस तसेच खाजगी वाहने यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. त्यातून काही वेळा बाचाबाची आणि मारहाणी चे प्रकार सुद्धा घडतात.मात्र यावेळी गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य असं वाहतुकीचे नियोजन करण्यात आलं या नियोजनात स्वतः पोलीस निरीक्षक सचिन सावंत सुद्धा वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उभे असल्याचे अनेक वेळा शृंगारतळी बाजारपेठेत दिसले. त्यामुळे त्यांचही कौतुक होत आहे. सुनियोजित कारभारामुळे यावर्षी वाहतूक कोंडी टळली हे मात्र तेवढेच खरे शृंगारतळीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद मोहिते पोलीस नाईक किशोर साळवी ,होमगार्ड विखारे ,पेजले, पवार, चव्हाण ,असे शृंगारतळी वाहतूक नियमन करीत आहेत
