खेड – एका विशिष्ट अशा शादी डॉट कॉम स्थळावर मुलींचे फेक प्रोफाइल बनवून पैसे घेणारा मास्टर माईंड आरोपीला खेड पोलिसांनी अटक केल्याने खेड पोलिसांवर अभिनंदन आता वर्षाव होत आहे.
गेले काही दिवस शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर मुलींच्या नावाने फेक प्रोफाइल तयार करून त्याद्वारे लग्नाचे आमिष दाखवून आरोपी मनोज छोटूराम योगी हा आरोपी फिर्यादी मुलांकडून व मुलींकडून पैसे वसूल करत होता. व अशा प्रकारे फसवणूक करत होता. त्यामुळे या आरोपी विरोधात 77 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार रजिस्टर करण्यात आली होती. आरोपी हा मूळचा राजस्थान मधला असून मुंबई येथील ठाणे ,मानपाडा ,डोंबिवली आदी परिसरात ठिकाण बदलून राहत होता. खेड पोलिसांनी एक विशिष्ट पथक तयार करून त्याला ठाणे नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला असता सापळा रचून या आरोपीला पकडले या आरोपींनी अजून किती मुलांना व मुलींना फसवलं आहे. याची माहिती या आरोपीकडून पोलीस मिळवत आहेत त्या पद्धतीने सध्या तपास सुरू आहे.या आरोपीने या साइट वरून अशा काही मुलांना व मुलींना जर फसवले असेल तर त्यांनी खेड पोलिसांशी संपर्क साधावा असा आवाहन सुद्धा खेड पोलिसांनी केले आहे.ही कामगिरी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर ,पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनवणे ,अजय कडू ,वैभव ओहोळ ,श्रद्धा पवार ,शबाना मुल्ला यांनी पार पाडली या सर्व पोलिसांचं सध्या खेडसह रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.