चिपळूण – चिपळूण येथे रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी आज चिपळूण मधील मीडिया हाऊसला सदिच्छा भेट दिली.यावेळी राजमाने यांनी पत्रकारांसोबत विविध विषयावर दिलखुलास चर्चा केली अनेक गोष्टींवर मोलाचे मार्गदर्शनही केलं.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे पुणे ,अमरावती ,सांगली, सातारा, या परिसरात आपली सेवा बजावून ते चिपळूण ला आलेले आहेत.
अतिशय मनमिळावू स्वभावाचे असणारे हे पोलीस अधिकारी यांनी आज मीडिया हाऊसला भेट देताना अनेक ठिकाणी आपण काम केलेल्या आणि त्या ठिकाणी विशेष प्रसंग घडलेल्या घटनांना उजाळा देत अनेक विषयावर या ठिकाणी चर्चा केली.
मीडिया हाऊस आगामी काळात कशाप्रकारे कार्य करावे याच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स त्यांनी दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक इनायत मुकादम ,मीडिया हाऊसचे संचालक संतोष पिलके, गजेंद्र खडपे, लक्ष्मीकांत घोणसेपाटील आदींसह पत्रकार बाळू कांबळे, संदीप बांद्रे, तुषार गोसावी आधी उपस्थित होते.
चिपळूण अतिशय शांत शहर असून या परिसरात काम करण्याचा आपल्याला वेगळा अनुभव मिळेल असे ही त्यांनी या भेटीदरम्यान मीडिया हाऊस मधील चर्चेदरम्यान सांगितले. तसेच या मीडिया हाऊसच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न करा असा मोलाचा सल्ला त्यांनी मीडिया हाऊसच्या संचालकांना दिला.