गुहागर – संध्याकाळचे चार वाजलेत आणि त्याचवेळी शृंगारतळीवर काहीतरी गडबड होते. शृंगारतळी येथे कर्तव्यावर असलेले पोलीस एका व्यक्तीचा पाठलाग करतात आणि त्याला पकडतात ……त्यानंतर जो प्रकार समोर आला तो मात्र खूपच भयानक होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी महाराष्ट्रातल्या पोलिसांनी पकडल्याने या पोलिसांच्या सध्या अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
उत्तर प्रदेश मधून एक आरोपी जानेवारी 2023 मध्ये अल्पवयीन मुलीशी लग्न करून पळाला होता. त्यानंतर तो आरोपी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या ठिकाणी असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या पोलिसांना लागली होती. त्याचा तपास करत त्याला पकडण्यासाठी आज उत्तर प्रदेश येथील पोलीस अंकित सिंग व आशिष शर्मा हे
आरोपी चेतन झल्लू निषाद याला पकडण्यासाठी आज गुहागर येथे आले होते.. त्यावेळी गुहागर पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्या आरोपीचे घर शोधून काढलं आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं मात्र त्याचवेळी त्या आरोपीने उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देत त्या ठिकाणावरून पळ काढला. काही वेळ शोधाशोध केल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस पुन्हा उत्तर प्रदेश कडे जाण्यासाठी निघाले असतानाच ……..याच आरोपीला शृंगारतळी येथील कर्तव्यावर असलेल्या गुहागरच्या पोलिसांनी पकडून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले त्यामुळे सध्या शृंगारतळी आणि गुहागर मध्ये एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी महाराष्ट्राच्या पोलिसांनी पकडला.
गुहागरच्या जाबाज पोलिसांनी जी मेहनत घेतली त्यांचा सध्या कौतुक होत आहे. शृंगारतळी येथे कर्तव्यावर असणारे एएसआय प्रमोद मोहिते, पोलीस शिपाई प्रितेश रहाटे ,पोलीस शिपाई प्रथमेश कदम, पवन कांबळे ,पोलीस नाईक लुकमान तडवी.यांनी स्थानिक किंवा कार्यकर्ते नासिम साल्हे यांच्या मदतीने त्या आरोपीला पकडले.या सर्व टीमचं गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत , पोलीस उपनिरीक्षक तुषार पाचपुते आदींनी कौतुक केल आहे.