मुंबई – राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अर्थसंकल्प सादर करत केली. हा अर्थसंकल्प सर्वांगीण असेल असं याआधीपासूनच सांगण्यात येत होते. कृषी क्षेत्रासाठी भरघोस मदत जाहीर केल्यानंतर महिलांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांना आता अवध्या निम्म्या दरात प्रवास करता येणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. महिलांसाठी आणखी योजना काय? चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर. मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना. आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये. गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ. जन्मानंतर मुलीला 5000 रुपये. पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये. अकरावीत 8000 रुपये. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये. करण्यात आले.