खेड – माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) च्या एका पथकाने आज पहाटे खेड येथील येथील फार्म हाऊस वरुन ताब्यात घेतले सुरुवातील काही वेळ त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सदानंद कदम हे एक मोठे व्यवसायिक असून ते ठाकरे गटातील अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. नुकत्याच खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे म्हंटले जाते. शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांचे धाकटे बंधू उद्योजक सदानंद कदम यांची सक्तवसुली संचालनालय (ईडी) कडून काही महिन्यांपासून चौकशी सुरू केली होती. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ही चौकशी सुरू असल्याचं समजतं. दापोलीतील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्ट सोबत सदानंद कदम व ठाकरे गटातील वकील अनिल परब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या संशयावरुन ही चौकशी सुरू आहे. आज पहाटे सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने उद्योजक कदम यांना येथील फार्म हाऊस वरुन ताब्यात घेतले आहे.
रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यात सध्या वाद असून रामदास कदम यांच्यात सख्ख्या भावाला ताब्यात घेतल्याने खेड शहरासह संपूर्ण राज्यभरात एकच चर्चेचा विषय बनला आहे.