बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील चिवेली फाटा येथे पट्टेरी वाघाच्या कातड्याच्या तस्करीप्रकरणी वनविभाग व रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाने तिघांना रंगेहाथ पकडले. हेमंत भिकू रामाणे (वय ४६, रा. आड बंदरवाडी, ता. म्हसळा, जिल्हा- रायगड, सध्या रा. बोरीवली), दिनेश लक्ष्मण तांबिटकर (वय-४८ रा. बामणोली, ता. चिपळूण), आशितोष मुकुंद धारसे (वय- २२, मोटवली, ता. महाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार काही इसम वन्यप्राण्यांच्या कातडीची अवैध तस्करी व विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी वनविभाग व रत्नागिरी येथील दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. यानुसार या दोन्ही पथकाने चिवेलीफाटा परिसरात शुक्रवारी संध्याकाळी सापळा रचला. यावेळी संक्षयितरित्या वावरणाऱ्या तीन इसमांकडे चौकशी करून तपासणी करताना त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडील सॅक (पिशवी)ची तपासणी केली असता त्यामध्ये वन्यप्राण्याचे कातडे मिळून आले. यामध्ये पट्टेरी वाघाचे कातडे असल्याचे समोर आले. पट्टेरी वाघाच्या सुकलेल्या कातड्याची नाकापासून शेपटीपर्यंतची लांबी १२० से.मी पुढील उजव्या व डाव्या पायाची उंची ३२ से.मी मागील डाव्या व उजव्या पायाची उंची ३२ से.मी शेपटीची लांबी ३० से.मी. आढळून आली आहे. ही संयुक्त कारवाई दहशतवाद विरोधी पथकाकडून पोलिस उपनिरिक्षक व्हि. के. नरवणे, अंबलदार गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चांदणे, भुजबळराव, शेलार, अमर मोरे, चालक कदम यांचे समवेत वनपाल चिपळूण डी. आर भोसले, गुहागर वनपाल, एस. व्हि. परशेट्ये, कोळकेवाडी वनरक्षक श्री वनरक्षक, रामपूर श्री. शिंदे, आबलोली वनरक्षक डुंडगे, रानवी वनरक्षक मांडवकर यांनी केली. ही कारवाई पोलिस अधिक्षक धनजंय कुलकर्णी, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here