गुहागर – राजापूर येथील नवोदय विद्यालयात सातवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या गुहागर तालुक्यातील आबलोली येथील अनुज संदेश साळवी यांनी जागतिक मान्यता प्राप्त क्लब क्यूब असोशियन मार्फत संयुक्त अरब अमिराती दुबई येथे 16 ते 17 डिसेंबर 2022 दरम्यान घेण्यात आलेल्या सन्मार्ग दुबई ओपन 2022 या स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली आहे.
यास या स्पर्धेत जगभरातील 28 देशांमधून 150 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भारत, जॉरर्डन, संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान, इजिप्त, कॅनडा, सीरीया युनायटेड किंगडम, तुर्के, रशिया, बहरीन, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, लेबनन, कोरिया, जपान, इटली, फिनलँड, डेन्मार्क, इक्केडोर इत्यादी देशांचा सहभाग होता.यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी व संचालिका सावी साळवे यांचा सुपुत्र अनुज साळवी याने एक रौप्य व एक कास्य पदक पटकावल्याने सर्व स्तरातून अभिनंदनचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असून यापूर्वी अनुज याने जागतिक दर्जाच्या क्यूब स्पर्धेत मुंबई येथे घेण्यात आलेल्या फिनिक्स क्यूब चॅलेंज 2022, केरळ येथील एमक्यूब ओपन 2022 आणि पुणे येथे घेण्यात आलेल्या आयआयएसईआर पुणे क्यूब ओपन 2022 या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून उज्वल यश संपादन केले आहे.