गुहागर – आज महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे.लोकशाहीत मतदानाला खूप मोठे महत्त्व आहे मतदान जर आपण केलं तर आपण येणाऱ्या सरकारला किंवा सत्तेवर येणाऱ्या राजकारणाला आपल्या मताचे महत्त्व पटवून सांगू शकतो. यासाठीच आजच्या दिवशी आपलं लग्न असताना सुद्धा पहिलं मतदान मग … लग्न असा निश्चय या युवकांनी केला आणि तो आज लग्न मंडपातून थेट मुंडावळ्या बांधून मतदानाला हजर झाला.गुहागर तालुक्यातील चिखली येथील अभिलाष गोयथळे या युवकाचे आज लग्न आहे लग्नाची धामधूम सुरू असताना आज आपल्याच गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे हे त्याच्या लक्षात आहे निवडून यावा ही त्या मागच्या अपेक्षा त्यासाठी लोकशाहीने दिलेला जो मला अधिकार आहे तो अधिकार बजावण्यासाठी त्यांनी प्रथम लग्नाच्या आधी मतदानाला महत्त्व दिले त्यामुळे अभिषेक आज संपूर्ण गुहागर तालुक्यातून त्याचे कौतुक केले जात आहे.