बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात रोजच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी रात्री पर्यत 24 तासात 86 कोरोना पॉझिटिव्ह बाधित रुग्ण आल्यानंतर चिपळूण, संगमेश्वर, व रत्नागिरी तालुक्यात असे तीन जण कोरोनामुळे मुर्त्यू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 40 झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. प्रशासनाने अनलॉक केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. समूह संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला असल्याने आरोग्य यंत्रणा हडबडली आहे. असुन आज 24 तासात 86 जण कोरोना बाधित आल्याने जिल्हा हादरून गेला. जिल्ह्यातील बळींची संख्या 40 तर कोरोनाग्रस्तांची संख्या 1156 झाली आहे. गुहागर तालुक्यातील चिखली येथे 26 तर घरडा केमिकल्स मध्ये 16 असे कोरोना बाधित रुग्ण एकाच दिवशी सापडल्याने यंत्रणेला धडकी भरली.
यामध्ये मिरकरवाडा, रत्नागिरी येथील 67 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण हा अनावली, संगमेश्वर येथील असून त्याचे वय 58 वर्षे होते. त्याला मधुमेहचा आजार होता. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच आज चिपळूण येथील एका 57 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बाधित मृत्यूंची संख्या आता 40 झाली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here