बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा प्रशासन मिशन ब्रेक द चेन म्हणत 1 जुलै ते 15 जुलै पर्यत कडक लॉकडाउन जाहीर केले होते. काल रात्री बारा वाजता या लॉकडाऊनची मुदत संपली. आजपासून जिल्हा प्रशासनाचे लॉकडाऊन नसेल. त्यामुळे दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. मात्र खबरदारीच्या उपाययोजना करून व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here