सगळं बरखास्त करा अन् शिंदे राज्य येऊ द्या – जयदेव ठाकरे

0
108
बातम्या शेअर करा

मुंबई – शिंदे गटाचा मेळावा बांद्रा कुर्ला संकुलातील विशाल मैदानावर सुरु आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधु जयदेव ठाकरे यांनी मंचावर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

जयदेव ठाकरे म्हणाले, मी इकडे आलो कारण एकनाथ माझा खुप आवडीचा आहे. आता तर मुख्यमंत्री आहे, त्यामुळे एकनाथराव म्हणावं लागलं. मला फोन येत आहेत की तुम्ही शिंदे गटात गेलात का? अरे हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथरावांनी दोन-चार भूमिका खुप चांगल्या घेतल्या आणि त्या मला आवडल्या. असा धडाडीचा माणूस आपल्या राज्याला हवा आहे. म्हणून मी त्याच्या प्रेमासाठी आलोय. आपला एक इतिहास आहे, चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि मध्यातंरीचा एकनाथ. त्यांना जवळच्याच लोकांनी संपवलं. ह्या एकनाथरावांना एकटे पडून देऊ नका. याला एकटा नाथ होऊ देऊ नका. हा एकनाथचं राहू द्या. ही तुम्हा सर्वांना विनंती आहे. एकनाथराव गोरगरिबांचे काम करीत आहेत. कष्टकरी आहे, राबकरी आहे याला दुरावा देऊ नका. हे सगळं बरखास्त करा आणि शिंदे राज्य येऊ द्या, अशा शुभेच्छा जयदेव ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here