शुंगारतळी ; त्या बेकरीवरील कारवाई नंतर सर्वच ठिकाण सूरु झाले स्वच्छता अभियान..

0
377
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील मदिना बेकरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईनंतर गुहागर तालुक्यातील अनेक बेकरी व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून सध्या सर्वच हॉटेल, चिकन सेंटर, मटण सेंटर यासह बेकरीमध्ये स्वच्छता अभियान सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रगती टाइम्सने सडेतोड वृत्त देऊन याबाबत आवाज उठविल्याने अनेकांनी प्रगती टाइम्सचे अभिनंदन आणि कौतुक करत आहेत.

शृंगारतळी येथील मदिना बेकरीमध्ये मुदत बाह्य पदार्थ विकले गेल्याच्या धक्कादायक प्रकार प्रगती टाइम्सने उघडकीस आणला त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने त्या ठिकाणी कारवाई करून जवळपास एक लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईची शृंगारतळीतील सर्वच नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. मात्र याचवेळी गुहागर तालुक्यात असणाऱ्या इतर बेकरीधारकांनी या कारवाईचा धसका घेतला असून सध्या तालुक्यातील सर्वच बेकरीसह हॉटेल ,चिकन सेंटर, मटण सेंटर या ठिकाणी स्वच्छता अभियान जोरदारपणे राबवीत असल्याचे पाहायला मिळत. एका नामवंत बेकरी कारवाई झाल्यानंतर आपल्या बेकरी वर कारवाई होईल या भीतीपोटी सर्वच बेकरी व्यावसायिकसह आप -आपल्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवीत आहेत. गुहागर तालक्यातील अनेक जणांनी ही कारवाई आधी झाली असती तर आपल्याला मुदत बाह्य संपलेले पदार्थ खावे लागले नसते अशी खंतही अनेक जण व्यक्त करत आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाने शृंगारतळी सह गुहागर तालुक्यातील संपूर्ण बेकरींची पाहणी करावी अशी मागणी ही आता जोर धरत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here