उदगीरचा सुपुत्र मराठी चित्रपटात झळकणार ; आपडी थापडी चित्रपटाला अनुप केंद्रेची ‘स्टेफनी’

0
1579
बातम्या शेअर करा

लातूर – के सायलेंटची प्रस्तुती असलेला आणि आनंद करीर दिग्दर्शित केलेल्या आपडी थापडी या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कुमठा खुर्द येथील अनुपकुमार केंद्रे यांनी चित्रपटातील मुख्य खलनायकाच्या स्टेफनीची भूमिका साकारली आहे. अनुपकुमार केंद्रे यांचा एक वेगळा लूक आणि एक वेगळी भूमिका या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनुपकुमार केंद्रे हे कुमठा खुर्द येथील. वडिलांचा व्यवसाय असल्याने हैदराबादमध्ये त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. २००५मध्ये गावी परत आल्यानंतर त्यांनी पदवी प्राप्त केली. अभिनयाचे खूळ लहानपणापासूनच डोक्यात होतं. या क्षेत्रात करिअर करायचं, यासाठीच हट्टाने मुंबईमध्ये एमबीए करण्याचं त्यांनी ठरवलं. मुंबई ही कलेची नगरी. या ठिकाणी आपल्याला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने वाट सापडेल, असे ठरवून ते मुंबईत आले आणि एमबीए पूर्ण केल्यानंतर कार्पोरेट क्षेत्रात तीन वर्षे नोकरी केली. पण, कार्पोरेट क्षेत्रात त्यांचे मन रमलं नाही. थोडे पैसे जमा झाल्यानंतर कलेच्या क्षेत्रात त्यांनी नशीब अजमाविण्याचा ठरवलं. सुरुवातीला थिएटर करण्याचं त्यांनी ठरवलं आणि पृथ्वी थिएटर, एनसीपीएच्या माध्यमातून या क्षेत्रात स्ट्रगल करण्यास सुरुवात केली. मालिका, जाहिरात अशा क्षेत्रात काम करीत असतानाच २०१९मध्ये अनुप केंद्रे यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे अभिनय क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच दोन वर्षे ब्रेक लागला. आईच्या जाण्याने बसलेल्या धक्क्यातून सावरणं फार अवघड होतं. पुन्हा मुंबईत येऊन स्ट्रगल करण्याची मानसिकता नव्हती, मात्र अनुप केंद्रे यांनी अभिनय क्षेत्रात नाव कमवाव, अशी आईची इच्छा असल्याने पुन्हा २०२०मध्ये अनुप केंद्रे यांचा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. पुन्हा त्यांनी थिएटर सुरू केलं.लॉकडाऊनच्या काळात जाहिराती तयार करण्याच्या क्षेत्रात मोठे नाव असलेले दिग्दर्शक आनंद करीर यांच्याशी त्यांची भेट झाली. आपडी थापडी या चित्रपटातील स्टेफनी या भूमिकेसाठी त्यांनी ऑडिशन दिलं. त्यांची निवडही झाली. पुढे आनंद करीर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने अनुप कुमार केंद्रे यांनी आपडी थापडीतील स्टेफनी या भूमिकेला चांगलाच न्याय दिला आहे. अनुपकुमार केंद्रे यांनी यापूर्वी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. कुमकुम भाग्यम, ये है अशीकी, सावधान इंडिया याचबरोबर काही जाहिरातीही केल्या आहेत. नुकतीच त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासोबतही एक जाहिरात केली आहे. कुमठा खुर्द गावातील या तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या क्षेत्रातील मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.*दिग्गज कलाकार…*आपडी थापडी या चित्रपटातील खलनायक नवीन प्रभाकर यांचा साला म्हणजेच स्टेफनीच्या भूमिकेत कुमठा खुर्दचा हा सुपुत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटांमध्ये श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, संदीप पाठक, खुशी हजारे, नवीन प्रभाकर यांच्यासोबत अनुप कुमार केंद्रे यांची एक वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. *फॅमिलीचा पिक्चर…*या भूमिकेसाठी मी दिग्दर्शक आनंद करीर यांना अपेक्षित असा न्याय देण्यास यशस्वी ठरलो आहे. नक्कीच प्रेक्षक माझ्या या भूमिकेचे स्वागत करतील, असे अनुप केंद्रे यांनी सांगितले. प्रेक्षकांनी फॅमिलीचा हा पिक्चर फॅमिलीसोबत सिनेमागृहात जाऊन बघावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here