मुंबई – शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे सणासुदीच्या पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने पगाराचे पूर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार करायचे कसे असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाने पैसे नसल्यामुळे मागील 2 महिन्यांपासून 90 हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केला नसल्याची माहिती मिळाली आहे.एसटी महामंडळाचे प्रती महिना 450 कोटी रूपये उत्पन्न तर खर्च प्रती महिना 650 कोटी रूपये आहे. एसटी महामंडळ चालवण्यासाठी प्रती महिना पगारासाठी 310 कोटी, डिझेल 250 कोटी तर इतर आस्थापनासाठी 90 कोटी रूपये खर्च होतो. एसटी महामंडळाला सरकारकडून 360 कोटी ऐवजी आता केवळ 100 कोटी रूपये निधी मिळत असल्याने उर्वरित 200 कोटी रूपये आणायचे कुठून असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.