दापोली – दापोली येथील शिवसंवाद यात्रेमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. रामदास कदम हे शिवसेनेबाबतची खोटी निष्ठा सांगतात.
लढायचं असेल तर मर्दासारखे लढा. शिवसेनेला कुणाचं शेपूट धरून जाण्याची गरज नाही. पण रामदास कदम यांना भाजपचे शेपूट जावं लागत आहे. जर हिंमत असेल तर आपल्या मुलाला आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगा, असे आव्हान देत रामदास कदम हे इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर डोळ्याला बाम लावून रडतात, अशी टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली. दापोलीत मध्ये शिवसंवाद यात्रेनिमित्त माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आ. भास्कर जाधव हे दापोलीत आले होते. यावेळी त्यांनी हा समाचार घेतला. निवडणुका कधीही होऊ शकतात. जर हे सरकार पडलं तर भाजप सरकार बनविणार नाही आणि राष्ट्रपती राजवट लागू होईल. विधानसभा बरखास्त होईल आणि विधानसभा बरखास्त झाली की पगार बंद होईल, असा उपरोक्त टोला यावेळी गीते यांनी विरोधकांना हाणला. तुमच्या सातपिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना कोणीही संपवू शकणार नाही, असा गर्भित इशारा यावेळी गीते यांनी विरोधकांना दिला आहे. एकीकडे शिवसेना म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे शिवसेनेचे धनुष्य गोठवायला सांगायचे, असा प्रकार सुरू आहे. ही जनता आणि हा शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही, असे देखील गीते यांनी सांगितले.