रत्नागिरी – शिवसेना फाटाफुटीचे लोण सर्वत्र दिसत असताना ते जिल्हा पातळीपर्यंत पोहोचले असताना रत्नागिरी जिल्ह्यातही शिंदे गटाने जोरदार हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम व रत्नागिरीचे आमदार व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या रूपाने एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून हे दोन मोहरे सुरुवातीलाच मिळाले आहे. जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढविण्याचा विडा उचललेल्या या दोन्ही नेत्यांनी येत्या काही दिवसात जिल्हातून आणखी काही बडे नेते शिंदे गटात दाखल होणार असल्याचे जाहीर करत काही दिग्गजांच्या संर्पक आत असल्याचे सांगितले होते. रामदास कदम व उदय सामंत हे शिवसेनेतील जिल्हय़ातील मोठे नेते आहेत. १०वर्षे आमदारकी भोगलेले माजी आमदार सदानंद चव्हाण हे आपल्या काही निवडक सहकारी यांचेसह ना. सामंतांच्या उपस्थितीत कालच ठाकरेसेनेला रामराम करीत शिंदे गटात सामिल झाल्याने हे दोन्ही नेते शिवसेना फोडण्यात यशस्वी होत चित्र संध्यातरी दिसत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांची नसून आमचीच खरी शिवसेना आहे असे सर्व शिंदे समर्थकांना वाटते. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत व जेष्ठ नेते रामदास कदम हे शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्यास आतूर झाले असताना दुसरीकडे ठाकरेनिष्ठ शिवसैनिकांनी ना. सामंत यांच्या दौऱ्यात काही ठिकाणी कडव्या पध्दतीने आंदोलन करीत त्याची प्रचीती नुकतीच दिली आहे. त्या सैनिकांचा नुकतेच उपनेते झालेल्या आम. राजन साळवी यांनी सत्कार ही केला. जिल्ह्यातील रत्नागिरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले ना. उदय सामंत यांना जिल्ह्यातील विशेषता रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर व चिपळूण या तालुक्यात शिवसैनिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधे मानणारा मोठा वर्ग आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत व सेनेत विविधपदे सांभाळली आहेत त्यांचा जनसंर्पकही दांडगा आहे. आता शिंदे गटाची ताकद वाढविण्यासाठी ना. सामंत हे या पाच तालुक्यांवर तर जेष्ठ नेते रामदास कदम हे दापोली, मंडणगड, खेड व गुहागर या चार तालुक्यासह जिल्हात लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख व तालुका प्रमुख नियुक्त झाले आहेत. जिल्हाप्रमुख पदावर माजी जिल्हाप्रमुख पद भुषविलेले शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती केली गेली. उत्तर रत्नागिरीत ही जिल्हाप्रमुख व तालुका प्रमुख लवकरच नियुक्ती केली जाणार असून जिल्हाप्रमुख पदावर सामंत याचे खंदे समर्थक बापू म्हाप व नुकतेच शिंदे गटात सामिल झालेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.