रत्नागिरी -रत्नागिरीच्या पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत मागील 10 दिवसापासून बेपत्ता आहेत.
या प्रकरणी संशयित म्हणून उपतालुकाप्रमुख असलेल्या त्यांच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल पतीकडे मिळाल्याने संपूर्ण प्रकरणात पतीवरील संशय अधिक बळावला आहे. माहितीनुसार, काल दिवसभर पोलिसांकडून रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने शोध घेण्यात आला होता. 1 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास कोणालाही न सांगता सावंत अचानक बेपत्ता झाल्या होत्या. मात्र आता या प्रकरणात पतीची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.