वाई -(प्रवीण गाडे ) सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस ठाण्यात वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलीसांना त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी केली होती. असता ते कोरोना पॉझिटिव्ह आले त्यानंतर मात्र त्यांच्या संपर्कात आलेले 16 पोलीस यांना विलगीकरण करण्यात आले होते. त्यांच्या स्वाबचे रात्री उशिरा आले. त्यात 12 जण पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.आता प्रांत अधिकारी संगीता राजपुरे-चौगुले यांच्याकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार ?,वाई पोलीस ठाणे कंटेंटमेंट झोन करणार काय?,असे ही प्रश्न वाईकराना पडले आहेत.