गुहागर -महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारा मध्ये गुहागर तालुक्यातील मुंढर ग्रामपंचायतने बाजी मारत प्रथम क्रमांक फटकवला असून या पुरस्काराचे १० लाखाचे मानकरी ठरले आहेत.हा पुरस्कार महाराष्ट्रचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी बी.एन.पाटीलमुख्यकार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड,अप्पर जिल्हाधिकारी शिंदे,यांच्या हस्ते सावकर नाट्यगृह रत्नागिरी येथे देण्यात आला.
या मिळालेल्या सन्मानामुळे मुंढर
ग्रामपंचायतचे अभिनंदन केले जात आहे. गुहागर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्यामधून मुंढर ग्रामपंचायतने आपला मानाचा तुरा उंचावला .अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनी या पुरस्कार देण्यात आला.यावेळी मिळाला पुरस्कार हा
मुंढर गावातील प्रत्येक नागरिकांच्या आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या सहकार्यामुळे मिळाला असल्याचे सरपंच सुशील आग्रे यांनी सांगितले.हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच सुशील आग्रे, ग्रामसेवक गोरे, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व मूंढर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.