कोल्हापूर मधून कोकणात येणारे दोन्ही मार्ग बंद

0
335
बातम्या शेअर करा

कोल्हापूर – राज्यभरात आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नदीवर नाले दुथडी भरून वाहत आहेत.

कोल्हापुराला या पावसाचा फटका बसला आहे. कोल्हापूर मधील पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी कोल्हापूर मधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने कोल्हापूर मधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राज्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून कोल्हापूरमध्ये ही पावसाचे संततदार कायम आहे.दरम्यान पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट आहे. मात्र सध्या पाणी चाळीस फुटावरून वाहत आहे. शिवाय राधानगरी धरण 100 टक्के भरले असल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले आहे त्यामुळे भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे परिणामी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.गगनबावडा घाट मार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद. लोंगे किरवे इथे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने मार्ग बंद आहे. तसेच कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केरली जवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग बंद आहे.शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण पाच राज्य मार्ग आणि 21 जिल्हा मार्ग बंद आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here