गुहागर तालुका प्रेस क्लबतर्फे गुणवंतांचा सत्कार

0
71
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेतर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालांत( बारावी ) परीक्षा, माध्यमिक शालांत ( दहावी )परीक्षा तसेच पुरस्कार संपादन करणारे प्रतिष्ठित नागरिक यांचा नुकताच सत्कार समारंभ संपन्न झाला.

माध्यमिक शालांत (इयत्ता दहावी ) परिक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक संपादन करणारे विद्यार्थी पाटपन्हाळे हायस्कूलची कु.श्रावणी गमरे (चिखली ) – ८९.२० टक्के , पाटपन्हाळे इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा प्रथमेश खैरे शृंगारतळी – ९४.८० टक्के , शृंगारी उर्दू हायस्कूलमधील कु.सामिया साल्हे (शृंगारी ) – ९५ टक्के , देवघर हायस्कूलमधील सार्थक चव्हाण (सुरळ )-७८ टक्के , मार्गताम्हाने इंग्लिश मीडियम हायस्कूलची अंतरा पोवळे ( मळण )- ८१.६० टक्के , पाटपन्हाळे हायस्कूलची श्रावणी पवार (शृंगारतळी )- ८४ टक्के या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष प्राविण्याने सुयश संपादन केल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी विद्यार्थी व पालकांचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.तसेच उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेतील कु.अर्पिता अमोल पोवळे ( मळण )- विज्ञान शाखेत ५८.६०टक्के गुण , कु. सिमरन संजय नागवेकर ( शृंगारतळी ) – चाटे कॉलेज कोल्हापूर हिने ९४.८३टक्के गुण संपादन करून चाटे ग्रुपमध्ये राज्यात मुलींमध्ये प्रथम ,चाटे कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांक तसेच माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष प्राविण्याचे सुयश संपादन केल्याबद्दल कु.सिमरन नागवेकर व कुटुंबियांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ तिच्या निवास्थानी देऊन अभिनंदन करण्यात आले. गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागरचे माजी अध्यक्ष पराग पां.कांबळे यांची सुकन्या कु.आदिती पराग कांबळे ( गुहागर )हिने “उद्योगधंदा प्रशासन स्नातक पदवी ” संपादन केल्याबद्दल गुहागर येथील निवासस्थानी आदिती कांबळे व कुटुंबियांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शृंगारतळीमधील प्रतिष्ठित नागरिक , नामवंत उद्योजक व व्यापारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मोहन संसारे यांनी नुकताच पुरस्कार संपादन केल्याबद्दल मोहन संसारे संसारेवहिनी यांचा त्यांच्या कार्यालयामध्ये शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.माध्यमिक शालांत (इयत्ता दहावी) परिक्षेमध्ये कु.यश लक्ष्मीकांत घोणसेपाटील (देवघर ) याने सुयश संपादन केल्याबद्दल तसेच लक्ष्‍मीकांत घोणसेपाटील यांनी “इलेक्ट्रॉनिक मिडीया पुरस्कार” संपादन केल्याबद्दल या पिता-पुत्रांचा सत्कार गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागरतर्फे करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी जाऊन विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन करून सुसंवाद साधल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेचा उपक्रम अतिशय प्रेरणादायी व विशेष उल्लेखनीय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सदर संस्थेचे विशेष आभार मानले. सदर गुणवंतांच्यासत्कार समारंभासाठी गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागरचे अध्यक्ष दिनेश चव्हाण , सल्लागार निसारखान सरगुरो , उपाध्यक्ष प्रशांत चव्हाण ,गणेश किर्वे, सचिव सुरेश आंबेकर , सहसचिव योगेश तेलगडे , खजिनदार अमोल पोवळे , माजी अध्यक्ष व सल्लागार उमेश शिंदे, गजानन जाधव , विनोद चव्हाण हे पदाधिकारी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here