मुंबई – एकीकडे शिवसेनेचे आमदार आणि खासदार बंड उभारून पक्ष नेतृत्वाला आव्हान देताना दिसतायेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांपुढे न झुकता राजीनाम्याची तयारी सुरु केली असल्याचं चित्र आहे.
गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये,’शिंदेसाहेब आगे बडो…हम तुम्हारे साथ है..! ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…!’अशा घोषणा देतांना 42 आमदार दिसत आहे. दरम्यान, 40 आमदार शिवसेनेचे असतील तर एकनाथ शिंदेंना भाजपसोबत सत्ता स्थापनेचा मोठी संधी आहे.तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली होती. मात्र बंडखोरांचे मत परिवर्तन होण्याऐवजी मुंबईत असलेले काही सेना आमदार शिंदेच्या गटात गेल्याचं पाहायला मिळालं. पक्षबंदी कायद्यांतर्गत कारवाई टाळायची असल्यास शिंदे गटाला ३७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सेनेचे केवळ आमदारच नाही तर खासदार देखील फुटले असून १८ पैकी ९ खासदार सध्या शिंदेंच्या गळाला लागल्याचं वृत्त आहे.