माझ्या लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर मी ते पद सोडायला तयार -उद्धव ठाकरे

0
64
बातम्या शेअर करा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकात गुंफलेले आहेत, ते वेगळे होऊ शकत नाहीत, म्हणूनच एकनाथ शिंदे, आदित्य काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाऊन आले, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला दिली.

मी बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहे. शिवसेना कोणाची, ती बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही का, असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र २०१४ मध्ये बिकट परिस्थितीतही विधानसभा निवडणुकीत ६४ आमदार निवडून आणले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचे आमदार सूरतला गेले, तिथून आसामला गेले अशी चर्चा आहे, मी त्यावर बोलणार नाही. शिवसैनिक मरमरुन निवडून आणतात, जनता निवडून देते, मग आमदारांवर शंका कशाला, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. शरद पवार यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रिपद स्वीकारलं, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन, तर सूरतला जाऊन का सांगता, बंडखोरांपैकी ज्यांनी मी मुख्यमंत्रिपदी नको असेन, त्यापैकी एकानेही समोर येऊन सांगावं, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो, मला सत्तेचा मोह नाही, मी आजच माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर नेतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या शिवसैनिकांना मी शिवसेना पक्षप्रमुखपदी नको असेन, त्यांनीही सांगावं, मी तेही पद सोडेन. पण माझ्याऐवजी मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक झाला, तर आनंदच असेल. तुम्ही आम्हाला नको, हे स्पष्टपणे सांगा, मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here