रत्नागिरी -एकीकडे स्वपक्षातूनच अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार टोला लागवला आहे.
पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. मातोश्री 11 IPL टीम बनवा, असे ट्विट त्यांनी केले आहे.निलेश राणे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थिती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा.”सध्या स्वपक्षांतील बंडखोरीमुळे अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा जोरदार टोला मानला जात आहे. जवळपास 75 टक्के आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याने सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना हा टोला जोरदार लागणारा आहे.