गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील महावितरणचे अधिकारी किती निर्लज्ज आणि निगरगट्ट आहेत. याचे उदाहरण दोन दिवसांपूर्वी संपूर्ण गुहागर तालुक्याने पाहिलं येथील हे अधिकारी बेजबाबदार असून माणुसकीशून्य असलेले अधिकारी आमच्या कोकणात नको असं निवेदन गुहागरवासियांकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देण्यात येणार आहे.
गुहागर शहरातील महावितरणच्या सबस्टेशन मधील ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या सुपरवायझरचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ज्या ठिकाणी हा कर्मचारी काम करत होता त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना येथील ग्रामस्थांनी फोन करून सांगितलं. त्याच वेळी येथील असणारे गलांडे नमक अधिकारी मी खूप बिझी आहे. मला खूप काम असतात. माझ्या खूप मिटींग्स आहेत. असं काम सांगून आजतागायत या कुटुंबाला भेटण्याचे टाळत आहे. असा हा माणुसकी शून्य असलेला अधिकारी या ठिकाणी नसलेले बरे असेच सर्व गुहागर वासिय म्हणत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्या ची तात्काळ येथून त्याची बदली करावी त्याला गडचिरोलीसारख्या भागात बढती द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करणार आहेत.
हा महावितरणचा गलांडे नामक अधिकारी अतिशय उद्धट असून येथील कर्मचाऱ्यांना सुद्धा अशाच प्रकारची वागणूक देतो. त्याचप्रमाणे त्याच्या हाताखाली काम करणारा एखादा इंजिनियर जर एखादे काम घेऊन त्याच्याकडे गेला ते वेळेवर करत नाही. त्याच प्रमाणे ज्या ठिकाणी आता अधिकारी नाही त्या ठिकाणी इतर अधिकाऱ्यांनी चार्ज घेतला असला तर त्याला काम करू देत नाही. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी या गलांडे नामक अधिकाराबद्दल आहे.
नुकताच वेलदुर येथील एका वाडी मध्ये लाईटची समस्या असून या ठिकाणीं अमेरिकेत व्यवसाय करत असलेल्या एका व्यक्तीने स्वखर्चाने याठिकाणी लाईटचे पोल उभे केले मात्र त्या व्यक्तीला हे अनेक कारणे सांगून हा व्यक्ती चार महिन्यापासून लाईटचे कनेक्शन देण्यात असमर्थ दाखवत आहे. येथील ग्रामस्थांना भडकवत रस्त्याशेजारील हे पोल काढायला सांगा असे स्वतः सांगत असून या ठिकाणच्या ग्रामस्थांना या गावात नवीन पोल टाकण्यासाठी माझी मंजुरी घेतल्याशिवाय कुणालाही पोल टाकून देऊ नका असे सांगत आहे. परिणामी गेल्या चार महिन्यापासून अमेरिकेत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला नवीन कनेक्शन साठी झुंजावे लागत आहे. कर विकास कामांना खीळ घालणाऱ्या या अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देणे गरजेचे असल्याने याबाबतची तक्रार सुद्धा ऊर्जा मंत्री यांच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये केली जाणार आहे.