कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास होणार आता सुपरफास्ट या गाड्या विजेवर चालणारे

0
58
बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याना कोकण रेल्वेचा मोठा फायदा होत आहे. आता ही रेल्वे लाईन विद्युतीकरण झाले तर त्याचा फायदा चाकरमान्यांसह गोव्यात जाणाऱ्या रेल्वेप्रवाशांना होणार आहे.

विद्युतीकरणामुळे प्रवाश्यांच्या वेळीची मोठी बचत होईल हे मात्र, नक्की आहे. नरेंद्र मोदी आज बंगळुरू येथून रिमोटद्वारे हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 2015 ला विद्युतीकरणाच्या कामाला सुरूवात झाली होती. या प्रकल्पाला तब्बल 1287 कोटी रूपयांचा खर्च आला आहे. विशेष म्हणजे कोरोना दरम्यानही हे विद्युतीकरणाचे काम बंद नव्हते. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सहा टप्प्यांमध्ये या मार्गाची पाहणी करूनच प्रमाणात पत्र दिले आहे. डिझेलवर होणारा खर्चही टाळता येणार आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वेची वार्षिक बचत दीडशे कोटींची होणार आहे. रेल्वे गाड्यांचा वेग वाढल्यामुळे त्याचा फायदा प्रवाशांना होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या दहा रेल्वे गाड्या या विजेवर धावणार आहेत, त्यामध्ये मंगळुरू सेंटर मडगाव पॅसेंजर स्पेशल, थिरूवनंतपुरम – निजामुद्दीन राजधानी एक्प्रेस, मडगाव-निजामुद्दीन राजधानी एक्प्रेस, मंगला एक्प्रेस, नेत्रावती एक्प्रेस, मत्स्यगंधा एक्प्रेस, सीएसएमटी-मंगळुरू जंक्शन एक्प्रेस, कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी अशा दहा एक्प्रेस धावतील.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here