पंधरा वर्षीय मुलाचा खेळताना साडीच्या झोपाळयाला फास लागुन दुर्दैवी मृत्यू

0
78
बातम्या शेअर करा

गुहागर – साडीच्या झोपाळ्यात खेळताना फास लागून एका १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुहागर तालुक्यात पालशेत बाजारपेठ सावरकर पेठ येथे हा दुर्देवी प्रकार घडला आहे.

निहाल सुभाष जाक्कर अस या मुलाचे नांव आहे. तो इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे. १८ जून रोजी शुक्रवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान निहाल एकटाच माळ्यावर खेळायला गेला होता. याच दरम्यान साडीच्या झोपाळ्यात मान अडकून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. शनिवारी या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात घडली आहे. या घटनेची खबर बेकरी मालक जितेंद्र दत्ताराम वायंगणकर वय 36 यांनी गुहागर पोलीस ठाणे येथे  माहिती दिली. त्यानुसार जितेंद्र वायंगणकर हे पालशेत बाजारपेठेत राहतात त्यांच्या घरी त्यांची पत्नी अपेक्षा,  मुलगी श्रेया,  त्यांचा आतेभाऊ सुभाष जाक्कर, त्यांची पत्नी शकुंतला जाक्कर, त्यांची मुले सृष्टी, निहाल व स्वराज अशी दोन कुटुंब एकत्र रहातात.  महिनाभरापूर्वी घरातील मुलांना खेळण्याकरता घराच्या माळ्यावर जितेंद्र वायंगणकर यांनी नायलॉन च्या साडीचा झोपाळा बांधलेला होता. या झोपाळ्यावर स्वराज श्रेया आणि निहाल हे दररोज खेळायचे. जितेंद्र वायंगणकर यांचे साखरी आगर येथे बेकरी व्यवसाय आहे.१८ डिसेंबर रोजी शुक्रवारी जितेंद्र वायंगणकर रात्री नऊ वाजता बेकरीतील काम आटपून घरी आले. त्यानंतर नंदकुमार धोपावकर यांच्याशी फोनवर बोलत जितेंद्र वायंगणकर घराच्या माळ्यावर गेले.  तिथे त्यांच्या आतेभावाचा मुलगा निहाल नायलॉन साडीच्या झोपाळ्यात अडकलेला त्यांना दिसला. निहालच्या मानेला साडीचे वेटोळे होते. तर निहालचे पाय लोंबकळत होते.  तातडीने त्यांनी सुभाषला बोलावले. दोघांनी नायलॉन साडीच्या झोपाळ्यात अडकलेल्या निहालला सोडवायला सुरुवात केली. नेहाला नेहाला माळ्यावरून खाली आणून डॉक्टर ढेरे यांच्या दवाखान्यात ते घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी तपासून नेहाला पुढे घेऊन जाण्यास सांगितले म्हणून जितेंद्र आणि सुभाष हे दोघेही निहालला घेऊन शृंगारतळी येथील डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या दवाखान्यात गेले. त्यावेळी डॉक्टर पवार यांनी निहालचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.                                                                    शुक्रवारी रात्री नऊ वा.च्या दरम्यान निहाल एकटाच माळ्यावर खेळायला गेला होता. याच दरम्यान साडीच्या झोपाळ्यात मान अडकून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ऊशिरा निहालचा मृतदेह चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर शोकाकूल वातावरणात पालशेतमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास गुहागरचे प्रभारी पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here