बातम्या शेअर करा

चिपळूण -आजच्या युगात माणसांपेक्षा मुकी जनावर किती इमानी वफादारी असतात, अलोरे मधील सुजय गावठेच्या कॅस्पर कुत्र्याने दाखवून दिले. सदरची घटना अलोरेमध्ये घडलेली आहे. दोन दिवसापूर्वी कोळकेवाडी धरणांमध्ये चार जण बुडणारी घटना घडली. त्यात, चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील सुजय गावठे हा बुडत असताना त्याचा लाडका कॅस्पर नावाचा कुत्रा त्याच्याबरोबर होता. आपला मालक पाण्यामध्ये बुडत आहे हे पाहून त्यानेही पाण्यात उडी मारली आणि मोठ्यामोठ्याने भुंकू लागला. मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याचे प्रयत्न असफल ठरले पाण्यात पोहत पोहत तो तांबडवाडी मध्ये बाहेर पडला. त्यानंतर त्याला घरात आणण्यात आले. घरामध्ये आल्यानंतर तो खूप शांत होता. तो जेवला सुद्धा नाही. आपला मालक परत येईल याची तो वाट पाहू लागला आणि एकच सदामा त्याला बसला. दुसऱ्या दिवशी त्याला कोळकेवाडी घटनास्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली.आपला मालक पुढे येत नाही. त्यामुळे तो व्याकुळ झाला आणि तेथून तो परत घरी आल्यानंतर त्याने घराच्या बाहेरच अंगणातच मान टाकली. अन त्या ठिकाणीच आपला जीव सोडला जिथे सुजय तिथे त्याचा कुत्रा हे एक समीकरण बनल होत. अजून सुजय बेपत्ता असून दोन दिवस होऊनही सापडला नाही. पण त्यापूर्वीच त्याच्या कुत्र्याला चाहूल लागली आणि त्याने सुजयच्या आठवणीत आपला जीव सोडला.आज सोशल मीडियावर कॅस्परचे कुत्र्याच्या वफादारीचे कौतुक होत असून सारे जन त्याला मिस करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here