बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील चार युवक कोळकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले असता कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने चोघे बुडत असता स्थानिकांनी दोघाना वाचवले तर दोघे अद्याप बेपत्ता आहेत.त्यात अलोरे सोमेश्वर मंदिर नजीक राहणारा सुजय गावठे व त्याची मैत्रीण ऐश्वर्या खांडेकर यांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सायंकाळी ५ च्या सुजय गावठे ,ऐश्वर्या खांडेकर सोबत शाहीन कुट्टीनो ,रुद्र जंगम असे सर्व जण कोळकेवाडी टप्पा चार नजीक कालव्याच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेल्यावर ही दुर्घटना घडली . हे सर्व पाण्यात अडकताच आरडा ओरड केली त्यातून लगत काम करणाऱ्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि रुद्र आणि शाहीन याना बाहेर काढले यावेळी सुजय बाहेर येत होता मात्र ऐशवर्या बुडत असल्याचे बघून पाण्यात परत गेला.त्यानंतर दोघे बेपत्ता झाले अलोरे पंचक्रोशीतील विनोद झगडे, तुषार चव्हाण, प्रमोद महाजन, घनश्याम पालांडे, प्रकाश आंब्रे आणि अनेक युवा कार्यकर्त्यांनी कोळकेवाडी धरण परिसराकडे धाव घेतली .त्यानंतर बचाव कार्य सुरुवात झाली त्यानंतर आलोरे शिरगावचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी माहिती घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पाहणी केली बेपत्ता असलेल्या दोघांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र रात्र होती त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले .याबाबत अलोरे परिसरात शोकाकुल पसरली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here