बातम्या शेअर करा

दापोली – दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट बोट समुद्र किनाऱ्यावर सुरक्षितरित्या ऊभी आहे. या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही नौका किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी ११वा.च्या सुमारास ही नौका आल्याने मोठे कुतुहल निर्माण झाले होते. मात्र ही बोट भारतीय तररक्षक दलाची असल्याचे स्पष्ट झाले. ही बोट मुंबईकडे निघाली होती मात्र तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे पाळंदे समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक असे या बोटीवर लीहिले आहे. सकाळी ११ च्या सुमारास एक मोठी नौका किनाऱ्याच्या दिशेने आली त्यामुळे ग्रामस्थांची उत्सुकता वाढली होती. त्यामुळे नागरिकांनी ही नौका पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान याबाबत तटरक्षक दलाचे राजा चोलन यांनी सांगितले की ही बोट मुंबईकडे निघाली होती याचवेळी हर्णै जवळ समुद्रात असताना  इंजिन बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने ती तातडीने किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. ही बोट दुरुस्ती झाल्यावर पुढे मुंबईकडे जाणार आहे. लवकरच ही बोट दुरूस्तीनंतर मुंबईकडे रवाना होईल त्यामुळे कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही अशी माहिती तटरक्षक दलाचे अधिकारी श्री.राजा यांनी दिली. जमीन,बर्फ, पाणी यावरून मार्गक्रमण करणारि ही नौका पाळंदे समुद्रकिनारी काही काळ थांबल्याने दुरून का होईना पण हॉवर क्राफ्ट नौका पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान येथील अधिकारी कर्मचारी यांचीही आस्थेने चौकशी करून मदतीसाठीही विचारणा केली.दुपारी उशिरापर्यंत या नौकेच्या इंजिनचे दुरुस्ती काम सुरू होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here