खेड – रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईकडे जाताना कशेडी घाटात पोलादपूर जवळ दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.
मुंबई -गोवा या महामार्गावर धामनदेवी ,पोलादपूर येथे ही दरड कोसळली आहे. दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून दरड काढण्याची कारवाई सुरू आहे. तरी, सदर मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.
