बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने जवळ पुन्हा एकदा बिबट्याचे कातडे आणि बंदूक जप्त करण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

चिपळुण तालुक्यांतील मार्गताम्हाणे जवळील गुढेफाटा ते पाथर्डी रोडवर दोन इसम मोटारसायकल वरून बिबट्याचे कातडे तसेच सिंगल बॅरल काडतुसची परवाना नसलेली बंदुक आणि चार जिवंत काडतुसे घेऊन जाताना रंगेहाथ पकडले. हि कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांचे वतीने करण्यात आली.

यातील आरोपी सचिन रामचंद्र साखरकर रा. डूंगवे, साखरकरवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी व प्रदेश प्रकाश बुदर,, रा. बुदरवाडी, गुडे, ता. चिपळूण, यांना या प्रकरणात अटक करण्यात आली.

आज न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता १६ तारखेर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई सपोफौ. प्रशांत शिंदे, पोलीस ठाणे हे करीत आहेत. पोलीस अधीक्षक, डॉ. मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली सदर कामगिरीत
चिपळुण पोलीस ठाण्याचे पोउनि माने, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोफौ प्रशांत बोरकर,
पो हवालदार नितीन डोमणे, अरुण चाळके, बाळु पालकर, पो.ना. योगेश नार्वेकर, सत्यजित दरेकर व दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला. आणि वनविभागाचे दत्ताराम राजाराम सुर्वे यांनी मदत केली.

वन्य जीव प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४,४८,५०,५१ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here