चिपळूण – चिपळूण तालुक्यातील पेढांबे गावात निसर्गरम्य वातावरणात डी-स्टार एन्टरटेन्मेंट वॉटरपार्क व रिसॉर्टचा प्रकल्प आठ एकरच्या विस्तीर्ण परिसरात साकारला आहे. या वॉटरपार्कचा शुभारंभ दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्रीमती सुधा वासुदेव देसाई यांच्या शुभहस्ते होत आहे, अशी माहिती डी-स्टार एन्टरटेन्मेंट वॉटरपार्क ॲण्ड रिसॉर्टचे मालक प्रकाश वासुदेव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.