खेड ; खोका तोड प्रकरण चर्मकार समाज आक्रमक, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
148
बातम्या शेअर करा

खेड – शहरातील डाकबंगला येथील नगरपालिकेच्या जागेत चर्मकार समाजाचे उमेश खेडेकर यांचा 22 वर्ष असणारा खोका अज्ञात समाज कंटकांनी तोडला असून हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी चर्मकार समाज आता आक्रमक झाला आहे.


सन १९९९ ला उमेश खेडेकर यांनी नगरपालिकेला रीतसर अर्ज करून समाज कल्याण विभागामार्फत गटई कामगारांना मिळणाऱ्या खोक्यास जागा देण्याची विनंती केली. डाकबंगला येथे नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत सदर खोक्यामध्ये ते चर्मकार व्यवसाय करत होते. सदर खोक्याच्या मागे जागा असणारे अलिखान महाडिक, एजाज महाडिक यांनी त्यांच्या जागेत विनापरवाना बारा खोके उभे करताना खेडेकर यांच्या खोक्यामध्ये माती आणि दगड टाकून सदर चर्मकार समाजाचा खोका बुजविण्याचा प्रकार केला. तर खेडेकर यांनी उभा केलेला लोखंडी खोका तोडून तो लपविण्याचा ही गंभीर प्रकार केला आहे. वास्तविक जर खेडेकर यांचा खोका न. पा. च्या जागेत होता. तर ही कारवाई नगरपालिकेने करणे इष्ट होते. परंतु इतरांना तोडण्याचे तोंडी आदेश मुख्याधिकारी आणि इंजिनियर यांनी कसे दिले? याच दुकानाच्या शेजारी कै. समीर शिंदे यांचा खोका असून त्याला नगरपालिकेने परवानगी दिली आहे. तर या खोक्याचा थकीत टॅक्स २७८१६/-रु इतका आहे. जर शिंदे यांचा खोका नगरपालिकेच्या जागेत येतो तर उमेश खेडेकर यांचा खोका खाजगी जागेत येत असल्याचा जावई शोध मुख्याधिकारी यांनी लावला. यामुळे मुख्याधिकारी यांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी चर्मकार समाजाच्यावतीने करण्यात आली असून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी चर्मकार समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.


उपोषणाला पाठिंबा
चर्मकार समाजाचे उमेश खेडेकर यांचा समाज कल्याण विभागाचा गटई कामगाराचा खोका समाज कंटकांनी तोडला असून याच्या निषेधार्थ सोमवार दि २८ मार्च पासून ते खेड नागरपालिके समोर उपोषण सुरू करणार असून या उपोषणाला खेड तालुका रोहिदास समाज आणि खेड शहर रोहिदा सामाजाने पाठिंबा दिला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here