गुहागर – (विशेष प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तर गुहागर तालुक्यातही दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे देवघर येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर, 12 जणांच्या घरात पाणी शिरल्याने या नागरिकांनाही या पावसाचा फटका बसला असून नुकसान झाले आहे.
गुहागर -चिपळूण मार्गावरील देवघरमध्ये मुसळधार पाऊस. झाला या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणच्या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याशेजारील घरात पाणी घरांमध्ये घुसले आणि त्यामुळे येथे 12 जणांच्या घरात नुकसान झाले असुन त्यांची भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.
गुहागर -विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला गटारांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साठत आहे. त्यामुळे हे पाणी थेट नागरिकांच्या थेट घरात घुसत आहे. यापूर्वी असं कधीही घडले नव्हते मात्र, यावेळी या रस्त्याच्या कामामुळे घरात पाणी घुसल्याने ही परस्थिती उदभवली आहे.
याबाबत येथील ग्रामस्थांनी गुहागरच्या तहसीलदार लता धोत्रे यांना संपर्क साधला असता तात्काळ गुहागरच्या तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ज्या ठिकाणी घरामध्ये नागरिकांच्या पाणी घुसलं होतं.त्या ठिकाणी ठेकेदाराला त्वरित कारवाई करण्यास सांगून गटार काढण्यास सांगितले. तर ज्या ठिकाणी पाणी तुंबत आहे त्या ठिकाणी पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी त्यांनी आदेश दिले. यापुढे इथे कोणत्याही प्रकारचे पाणी साठणार नाही किंवा तुंबणार नाही त्याची खबरदारी घेण्याचे आदेश सुद्धा तहसीलदार यांनी ठेकेदाराला दिले.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/07/IMG-20200707-WA0052-1024x576.jpg)