गुहागर – दाभोळ खाडीतील खाडी शेजारी अनेक ठिकाणी कांदळवन मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने वृक्षप्रेमी यांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
दापोली तालुक्यातील फरारे खाडीकिनारी असणाऱ्या कांदळवन येथे मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याने येथील मच्छीमारांच्या निदर्शनास आले यावेळी ही तोड एक कंपनीची मोठी बार्ज लागावी यासाठी केली जात असल्याची माहिती स्थानिकाना मिळाली यानंतर स्थानिकांनी याबाबत कांदळवन संरक्षक अधिकारी यांना याबाबत संपर्क साधला असता त्यांनी मात्र याबाबत कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कांदळवन तोडणाऱ्यांनी संबंधित अधिकारी वर्गाला आर्थिक दृष्ट्या लाभ देऊन गप्प केल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे. तरी संबंधित अधिकारी वर्गाने याकडे त्वरित लक्ष देऊन त्वरित थांबवावी अशी मागणी येथील स्थानिक करतात