चिपळूण -गेल्या काही महिन्यांपूर्वीच पिंपळीखुर्द येथे वाशिष्ठी मिल्क अंड प्रॉडक्ट्सचे थाटामाटात भूमिपूजन झाले होते. या प्रकल्पांतर्गत ईटीपी प्लांटचे भूमिपूजन शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली.

कोकण विभागात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व उद्योजक प्रशांत यादव यांच्या संकल्पनेतून पिंपळीखुर्द येथे काही दिवसांपूर्वी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या प्रकल्पाचे भूमिपूजन चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम,यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून या प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आणि हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार असून या प्रकल्पांतर्गत ईटीपी प्लांटचा भूमिपूजन सोहोळा शुक्रवार दिनांक १८ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. एकंदरीत हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत असून लवकरच तो कोकणवासीयांच्या सेवेत रुजू होईल. सदरच्या प्रकल्पासाठी उद्योजक प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्ग मेहनत घेत असून प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. तरी या प्रकल्पातील ईटीपी प्लांटच्या भूमिपूजन समारंभास चिपळूण तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाशिष्टी मिल्कच्या वतीने करण्यात आले आहे.