गुहागर तहसीलदार यांच्या मार्फत कातकरी बांधवांना फराळाचे वाटप

0
472
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील गिमवी येथील कातकरवाडी मधील दहा कुटुंबाला महसूल यंत्रणेमार्फत आज फराळाचे वाटप करण्यात आले.

दिवाळी हा मोठा सण या सणात प्रत्येकाच्या घरी गोड-पदार्थ होत असतात मात्र याच वेळी समाजापासून वंचित असलेल्या घटकही या दिवाळीत सामील व्हावा यासाठी गुहागर महसूल यंत्रणा याठिकाणी प्रयत्न करताना दिसते याच माध्यमातून गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी गुहागर तालुक्यातील गिमवी येथील कातकरवाडी मध्ये जाऊन दहा कुटुंबांना फराळाचे वाटप केले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल यंत्रणेचे अधिकारी सचिन गवळी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. दिवाळीनिमित्त ही भेट दिल्याने कातकर समाजातील बांधवयांनी समाधान व्यक्त केले


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here