एसटी कामगार कामावर हजर न झाल्यास कारवाई – अनिल परब

0
248
बातम्या शेअर करा

मुंबई – आज सोमवारपासून एस टी कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार-परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी सांगतिले.

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी राज्यातील २५० पैकी ३९ आगारांमध्ये संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. आज सोमवारपासून कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी रविवारी जाहीर केले. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता कामगारांना देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्यानंतर जवळपास १७ कामगार संघटनाच्या कृती समितीने २८ ऑक्टोबरला आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतरही काही मागण्यांसाठी राज्यातील काही आगारांत संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here