रत्नागिरी – रत्नागिरी जिल्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी अद्याप कोरोनाची साखळी तुटताना दिसत नाही. काल दिवसभर जिल्ह्यात 14 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे 710 वर कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला आहे. तर आतापर्यंत 27 जणांनाच मुर्त्य झाला आहे.
या मध्ये चिपळूण कामथे उपकेंद्रात 6, जिल्हा कोविड रुग्णालयात 6, तर खेड कळंबणी येथे 2 कोरोनाबाधितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी एका रुग्णाला बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात सध्या 49 अॅक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, दापोलीमध्ये 6 गावांमध्ये, खेडमध्ये 3 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 12 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरणात शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 24, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 1, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 10, ग्रामीण रुग्णालय गुहागर-1, केकेव्ही, दापोली – 24 असे एकूण 61 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.