सिंहगड एक्‍स्प्रेस 18 ऑक्‍टोबरपासून पुन्हा धावणार…

0
123
बातम्या शेअर करा

पुणे – करोनामुळे मागील वर्षी स्थगित केलेली पुणे-मुंबई सिंहगड एक्‍स्प्रेस 18 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. यामुळे पुणे-मुंबई-पुणेदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

18 ऑक्‍टोबरपासून पुण्याहून रोज सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी रेल्वे सुटणार असून, 9 वाजून 55 मिनिटांनी सीएसएमटी (मुंबई) येथे पोहोचणार आहे. तर सीएसएमटी येथून सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी एक्‍स्प्रेस सुटणार असून, रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहोचणार आहे. ही रेल्वे दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, चिंचवड, पिंपरी, खडकी आणि शिवाजीनगर येथे थांबणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here