चिपळूण ; अविनाश लाड यांचे काँग्रेसतर्फे जोरदार स्वागत

0
170
बातम्या शेअर करा

चिपळूण – रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष अविनाश लाड यांचे आज चिपळुणात जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर श्री. लाड पदग्रहण सोहळ्यासाठी मुंबईहून रत्नागिरीकडे निघाले होते. त्यादरम्यान श्री. लाड यांचे चिपळुणात आगमन झाले. यावेळी फटाक्यांची जोरदार आताषबाजी करण्यात आली. काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. लाड यांचे स्वागत केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मनोज शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश कातकर, शहराध्यक्ष लियाकत शाह, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गुलजार कुरवले, डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. सरफराज गोठे, राष्ट्र सेवादलच्या जिल्हाध्यक्षा नीलम शिंदे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, मनोज दळी, राकेश दाते, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष श्रद्धा कदम, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष साजिद सरगुरोह, अशपाक तांबे, इम्तियाज कडू, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते यश पिसे, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here